“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”

साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका निभावलेला प्रसिध्द कलाकार सिध्दार्थ सुर्यनारायणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने थेट भाजपच्या तमिळनाडू आयटी सेलवर सणसणाटी आरोप केले आहेत.

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिध्दार्थ सुर्यनारायणच्या ट्विटनंतर देशात खळबळ माजली आहे. सिध्दार्थ म्हणाला, “माझा फोन नंबर तमिळनाडू भाजप आणि  तमिळनाडू भाजप आयटी सेलने लिक केला आहे. मला आणि माझ्या कुटूंबाला गेल्या २४ तासात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि बलात्काराचे ५०० पेक्षा जास्त फोन आले आहेत”.

“फोन कॉल मी  रेकॉर्ड करून पोलिसांना दिले आहेत. मी शांत बसणार नाही, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. असं अभिनेता सिध्दार्थ सुर्यनारायण याने म्हटलं आहे”. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिध्दार्थने ट्विट टॅग केले आहे.

अभिनेता सिध्दार्थ सुर्यनारायण मुळचा चेन्नईचा आहे. हिंदी, तमिळ, तेलगू भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका निभावल्या आहेत. आपल्या अभिनयातून त्याने चाहत्यांवर छाप पाडली आहे. सोशल मिडियावर सिध्दार्थ नेहमी सक्रीय असतो.

बॉयज, आता, स्ट्रागयकर, रंग दे बसंती, ओय, १८० अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. आमिर खानसोबत सिध्दार्थने रंग दे बसंती चित्रपटात काम केले आहे. सिध्दार्थच्या चित्रपटांतील गाणी प्रेक्षकांना खुप आवडत असतात.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून विनोद खन्नाने मुकेश भट्टच्या दणादण कानाखाली वाजवल्या होत्या
‘विरासत’ चित्रपटातील अभिनेत्री पुजा बत्राने केले आहे खलनायकासोबत लग्न; पहा फोटो
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.