कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच माहीत होतं; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना येणार हे अल्लाला माहित होतं. त्यामुळेच कब्रस्थानासाठी जागा मिळाली. असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

सोशल मिडियावर आव्हाड यांचा  व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात जर आपल्याकडे कब्रस्थान नसते, तर शहराची काय अवस्था झाली असती, याची कल्पनाही करवत नाही.

ते पुढे म्हणाले की, अल्लाला २०२० मध्ये कोरोना येणार हे माहित होतं. म्हणून २०११ मध्येच कब्रस्थानासाठी जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानाचे काम पुर्ण झालं आहे. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आव्हाड यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील एका आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर
गजानन मारणेसाठी धडकी भरवणारी बातमी! पुण्यातील साम्राज्य उद्धवस्त करण्याची पोलीस आयुक्तांची घोषणा
ब्रेकिंग न्युज! पुण्यात उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, वाचा काय सुरू आणि काय बंद राहणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.