धर्म ही एक विशाल संकल्पना आहे. आपल्या देशात कोणताही हिंदू नावाचे रिलीजन नाही. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. तरी ते सर्व हिंदू स्वभावाचे धर्म आहेत, त्यामुळे ते हिंदू आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका मराठी दैनिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.(all-indians-are-hindu-rss-mohan-bhagvat-statement)
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, भारतात असलेल्या विविध धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले जात असले, तरी त्या सर्व धर्माचा स्वभाव एकसारखा म्हणजेच सर्वसमावेशक आहे. आपण सर्वांनी असा विचार केला तर मग भांडण असण्याचे कारण नाही.”
“भारतातून निघालेल्या सर्व विचार प्रवाह त्यांच्या विचारांबद्दल आग्रही असले, परस्पर विरोधी असले तरी ते असहिष्णू नाहीत. ते सर्व विचारप्रवाह सर्वसमावेशक आहेत. हिंदुत्व रिलीजन नाही, तो पूजा पद्धती रूढी-परंपरा, खाद्य पद्धतीमध्ये अडकलेला नाही. उलट हिंदुत्व म्हणजे धारण करणारा नियम आहे. त्यालाच आपण धर्म म्हणतो,” असे देखील मोहन भागवत म्हणाले.
“सावरकरांनी म्हंटलं होतं, ज्या दिवशी हिंदू समाज आणि राष्ट्र शास्त्रसंपन्न आणि बलसंपन्न होऊन जाईल, त्या दिवशी ही तो गीतेच्या तत्वांचे पालन करेल. इतरांना संपवणार नाही. हिंदुत्वमध्ये असे असमतोल कधीच नव्हते. आपणच हिंदुत्वाला पूजा पद्धत, रूढी-परंपरा, खाद्यसंस्कृतीमध्ये यामध्ये अडकलेलं आहे. हिंदुत्वमध्ये असे बंधन कधीच नाही”, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी कालीचरण महाराजांनी केलेल्या अतिवादी विधानाबद्दल उघड नाराजीही व्यक्त केली. हिंदुत्वाचे नावावर आज आपण त्याचा अर्थ विसरून जे काही करत आहोत, ते हिंदुत्व नाही. ते हिंदू वचन, हिंदू कर्म किंवा हिंदू मन मुळीच नाही, असे मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.
इंग्रंजांनी भारताचे तुकडे करण्यासाठी हिंदुत्वाची हीच सर्वसमावेशक भावना लोकांच्या मनात दुसर करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ब्रिटिशांना वाटायचं की याच्यातून काही काळे ब्रिटिश भविष्यात निर्माण होतील. दुर्देवाने आजही तसेच प्रयत्न होत आहेत”, अशी खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रम व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :-
मृत्यूनंतर तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेल्या लता मंगेशकर; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
लता मंगेशकर यांनी आयसीयूमध्ये असताना मागविले होते ईअरफोन्स; शेवटच्या क्षणी ऐकली ‘ही’ गाणी
नागिन ६ ठरणार आतापर्यंतची सर्वात महागडी मालिका, मालिकेचे बजेट वाचून अवाक व्हाल