कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….

https://mulukhmaidan.com/chief-minister-payment/

नुकताच पश्चिम बंगाल, केरळमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. केरळ राज्यात दुसऱ्यावेळी सत्तेवर पी विजयन आले आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच मंत्रिमंडळात त्यांनी नवीन चेहऱ्यांना स्थान दिल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केरळच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिना १ लाख ८५ हजार रुपये पगार मिळतो. तसेच या पगारामध्ये बेसिक पे, डियरनेस अलाऊंस, घर भाडे, हे सर्व खर्च सामील असतात.

विधानसभा निवडणूकांमुळे नुकत्याच काही राज्यातील निवडून आलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे कोणत्या मुख्यमंत्र्याला किती पगार मिळत असेल, असा प्रश्नही अनेक लोकांना आता पडला आहे.

भारतात प्रत्येक मुख्यमंत्र्यांना मिळणारे पगार वेगवेगळे आहेत. विजयन यांना मिळणारा पगार १८ राज्यांच्या मुख्यंत्र्यांपेक्षा कमी आहे. देशातील सर्वात जास्त पगार घेणारे मुख्यमंत्री तेलंगणाचे आहे, त्यांना दरमहिन्याला ४ लाख १० हजार रुपये पगार मिळतो. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४ लाख रुपये पगार मिळतो.

तसेच त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पगार ३ लाख ६५ हजार इतका आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दरमहिन्याला ३ लाख ६५ हजार रुपये भेटतात.

सर्वात कमी पगार नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो, तो म्हणजे १ लाख १० हजार. पुद्दुचेरी १ लाख २० हजार, बंगाल १ लाख १७ हजार, कर्नाटक २ लाख, गोवा २ लाख २० हजार, गुजरात ३ लाख २१ हजार, राजस्थान १ लाख ७५ हजार, उत्तराखंड १ लाख ७५ हजार, ओरिसा १ लाख ६५ हजार, मेघालय १ लाख ५० हजार, पंजाब २ लाख ९० हजार, आणि आंध्रप्रदेश ३ लाख ३५ हजार असे राज्यनुसार मुख्यमंत्र्यांना पगार मिळतात.

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
अजबंच! हा फोटो व्हायरल होताच आयफोन धारकांना ऍपल कंपनीने दिला धोक्याचा इशारा
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.