‘मानाचा मुजरा’चे १० लाख भरा; अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकरांसह ११ जणांना दणका

मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारप्रकरणी अलका कुबल, अभिनेता विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे. तत्कालीन संचालक मंडळाने १० लाख ७८ हजार रुपये इतकी रक्कम येत्या १५ दिवसात भरली नाही, तर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चाविरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दिली होती. विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल त्यावेळी संचालक होते. तक्रारीनंतर या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश सहआयुक्तांनी जानेवारी २०१९ मध्ये दिला होता.

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अभिनेता विजय पाटकर, दिगदर्शक विजय कोंडके, अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, सतिश बिडकर यांच्यासह ११ जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त ‘मानाचा मुजरा’ हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे २०१५ मध्ये झाला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप स्पष्ट झाला होता. मात्र, टंकलेखनात झालेल्या चुकीचा फायदा घेत हे पैसे अद्याप भरले गेले नव्हते. ‘खात्यामध्ये भरा’ ऐवजी ‘खात्यामधून भरा’, असा शब्द टाईप झाल्याने त्याचा संचालकांनी वेगळा अर्थ काढला.

धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…

मानसी नाईकनंतर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता अडकली विवाहबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो

शाब्बास रे पठ्ठ्या! भारतीय तरूणाने जवानांसाठी तयार केला अनोखा बुट; दुश्मनांना घालता येतील गोळ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.