पहा मराठमोळ्या अलका कुबलच्या नवऱ्याचे फोटो; आहे प्रसिद्ध फोटोग्राफर

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आदर्श सुन म्हणून अलका कुबलकडे पाहिले जाते. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीमध्ये त्यांच्याकडे आदर्श सुन आणि मुलगी म्हणून पाहिले जाते.

सतत कॅमेरासमोर असणाऱ्या अलका कुबल एका सिनेमॅटोग्राफरच्या प्रेमात पडल्या. त्यांचे नाव होते समीर आठल्य. समीर आणि अलका कुबलची भेट चित्रपटाच्या शुटिंग वेळी झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झाले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अलका कुबल आणि समीर या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. चित्रपटांच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. शुटिंगच्या वेळी दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते.

दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सर्वजण दोघांना प्रश्न विचारू लागले. दोघे अनेकदा एकत्र फिरायला जात होते. त्यामुळे चर्चा आणखीनच वाढल्या. दोघांनी एकमेकांना प्रोपोज केले नव्हते. ही गोष्ट अलका यांच्या घरी पोहोचली होती.

अलका कुबलच्या आईने त्यांना त्यांच्या नात्याबदल प्रश्न विचारले. त्यावेळी मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते. म्हणून त्यांनी समीरला हा प्रश्न विचारला. त्यांच्याकडे उत्तर नव्हते. अशा परिस्थितीत अलका कुबलने पुढाकार घेतला आणि समीरला लग्नासाठी प्रोपोज केले. त्यांनी लगेच होकार दिला.

अलका कुबलच्या घरच्यांनी सुरुवातीला लग्नाला नकार दिला होता. त्यांना वाटत होते की, हे लग्न जास्त काळ टिकू शकणार नाही. कारण दोघांचे काम खुप वेगळे आहेत. पण शेवटी ते लग्नाला तयार झाले. अतिशय धुमधडाक्यात समीर आणि अलका यांचे लग्न झाले.

आज अलका कुबल त्यांचे पती आणि मुलींसोबत सुखी संसार करत आहेत. अलका कुबल यांना लग्नानंतर इशानी आणि कस्तुरी दोन मुली झाल्या. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. पण अलका कुबल यांच्या मुलींनी मात्र अभिनय क्षेत्रात न येता. दुसऱ्या क्षेत्रांमध्ये करिअर केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा; शेअर केले बाथरुममधले फोटो

नवाब सैफ अली खानच्या बायकोचे होते ‘एवढ्या’ लोकांसोबत अफेअर

चक्क कॉलेज सेक्रेटरीच्या प्रेमात पडला होता श्रेयस तळपदे; वाचा त्याची लव्हस्टोरी

‘विरुष्का’च्या लेकीचं झालं बारसं; नाव वाचून आश्चर्य वाटेल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.