कोणाच्या जीवावर माज करतात; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल संतापल्या

मुंबई | ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून मुख्य नायिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड बाहेर पडली आहे. तिच्या जागी वीणा गायकवाड हिला घेण्यात आलेले आहे. प्राजक्ता बाहेर पडल्याचे कारण अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता यांचे वाद असल्याचे म्हटले जात आहे.

अशात अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाडला मालिकेतुन का बाहेर काढले याबाबत सांगितले आहे. तसेच अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाडवर काही आरोप देखील केले आहे. अलका कुबल या ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

मालिकेच्या सेटवर आल्यावर प्राजक्ता सतत रडत बसायची, नखरे करायची, मध्येच डोकं दुखतंय म्हणून शूटिंग थांबवायला लावायची. शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी तिला काढून टाकण्याचा सल्ला दिला, पण मी तिला समजून घेत होती, असे अलका कुबल यांनी म्हटले आहे.

सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे, तिचे सुरूच असायचे, तिच्यामुळे अनेक वेळा शूट रात्री पूर्ण करावे लागायचे. तरी तिच्या चेहऱ्यावर कुठला पश्चाताप नसायचा. या कलाकारांमध्ये एवढी हिंमत, येते कुठून आणि हे माज तरी कोणाच्या जीवावर करतात, असे म्हणत अलका कुबल यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच शूटिंगसाठी सगळे तिची वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे जेष्ठ कलाकार तिच्यासाठी थांबायचे, तरीही तिला कसलीच लाज नाहीये, असेही अलका कुबल यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू

भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.