मानव विविध ग्रहांवर जीवन आहे का? या प्रश्नाचा सध्या शोध घेत आहे. तसेच परग्रहांवर असलेल्या एलियन(Aliens )संदर्भात देखील मानव संशोधन करत आहे. पण यादरम्यान एका प्राध्यापकाने अजब दावा केला आहे. एक आक्रमक सरपटणारी प्रजाती मानवांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण जगामध्ये ही प्रजाती फॅसिस्ट कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा विचार करत आहे, असा दावा त्या प्राध्यापकाने केला आहे. (Aliens in an attempt to take over Earth Scientists warn )
हा अजब दावा करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव डॉ मायकेल सल्ला असे आहे. डॉ मायकेल सल्ला हे क्वीन्सलँड विद्यापीठातील फिलॉसॉफी विषयातील डॉक्टरेट मिळवलेले प्राध्यापक आहेत. डॉ मायकेल सल्ला गेल्या काही वर्षांपासून एलियन्स मानवी राजकारणावर कसा प्रभाव टाकू शकतात याचा अभ्यास करत आहेत .
डॉ मायकेल सल्ला यांनी एलियन्स संदर्भात अनेक पुस्तके लिहिली आहेत. एलियन्सच्या बाबतीत डॉ मायकेल सल्ला यांनी अनेक आश्चर्यकारक सिद्धांत जगापुढे मांडले आहेत. नुकताच त्यांनी एक नवीन सिद्धांत मांडला आहे. जेसन मीडिया यूट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीदरम्यान डॉ मायकेल सल्ला यांनी हा सिद्धांत मांडला आहे.
“जगात अशा अनेक विविध ग्रहांवरील प्रजाती आहेत, ते मानवाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. या एलियन्सनी इशारा दिला आहे की सरपटणारे एलियन पृथ्वीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत:, असा अजब सिद्धांत डॉ मायकेल सल्ला यांनी मांडला आहे. यावेळी डॉ मायकेल सल्ला म्हणाले की, “माझ्याकडे वेगवेगळ्या एलियन प्रजातींची छायाचित्रे आहेत. ह्या प्रजाती आपल्याकडे येत आहेत.”
“ह्या प्रजातींचा नेमका आकडा सांगता येणार नाही. हा आकडा प्रत्येकवेळी बदलत आहे. यातील अनेक प्रजातींना मानवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. यातील अनेक प्रजातींनी थेट मानवाच्या व्यवहारात हस्तक्षेप केला आहे. मी १७ वेगवेगळ्या प्रजातींबद्दल संशोधन केले आहे. ह्या प्रजाती थेट मानवांशी संवाद साधत आहेत. यामधील सहा प्रजाती सरकारशी सहमत आहेत आणि ११ प्रजाती नागरिकांसोबत संवाद साधत आहेत.”, असे डॉ मायकेल सल्ला यांनी सांगितले आहे.
डॉ मायकेल सल्ला पुढे म्हणाले की, “कधीकधी एलियन्स संवाद साधण्यासाठी मानवांना त्यांच्यासोबत यूएफओमध्ये घेऊन जातात. यापैकी बरेच सरपटणारे प्राणी एलियन आहेत. आपण त्यांना स्थानिक प्रजाती म्हणू शकतो. या एलियन्सनी जनुकीय अभियांत्रिकी आणि मानवतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असण्याची शक्यता आहे. हे एलियन्स सध्या जागतिक तापमानवाढीमुळे चिंतेत आहेत”, असे डॉ मायकेल सल्ला यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा
राज्यसभेत भाजपला जिंकवून देण्याचा मास्टर प्लॅन ‘या’ माजी शिवसैनिकानेच आखला; एकेकाळी होता ठाकरेंचा विश्वासू
“..त्यावेळी मी संजय दत्तच्या झिंज्या उपटल्या आणि खाड खाड कानाखाली वाजवल्या”