Share

RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर

alia bhatt

राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘RRR’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘RRR’ या चित्रपटात अजय देवगन ,ज्युनियर एनटीआर आणि राम चरण(Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.(Alia Bhatt was not the first choice for RRR)

तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हीने देखील ‘RRR’ या चित्रपटात सीतेची भूमिका केली आहे. या चित्रपटातील आलियाची भूमिका तुलनेने लहान आहे. तरी देखील प्रेक्षक आलियाच्या भूमिकेचे खूप कौतुक करत आहेत. पण ‘RRR’ या चित्रपटासाठी आलिया भट्ट ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भट्टची निवड करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.

मिळलेल्या माहितीनुसार, ‘RRR’ हा चित्रपट सुरवातीला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला ऑफर करण्यात आला होता. पण त्यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपटाच्या निर्मात्यांना नकार कळवला. अभिनेत्री श्रद्धा कपूरने यापूर्वी ‘साहो’ या तेलगू चित्रपटात भूमिका केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने प्रमुख भूमिका केली होती.

त्यानंतर ‘RRR’ हा चित्रपट अभिनेत्री परिणीती चोप्राला ऑफर करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा एका चित्रपटाचे प्रमोशन करत होती. त्यामुळे या व्यस्त कार्यक्रमातून तिला ‘RRR’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वेळ मिळत नव्हता. म्हणून अभिनेत्री परिणीती चोप्राने या चित्रपटाला नकार दिला.

मिळलेल्या माहितीनुसार, ‘RRR’ या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी टॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनची देखील निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी एमी जॅक्सन गर्भवती होती. त्यामुळे अभिनेत्री एमी जॅक्सनने या चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर नाकारली. ‘RRR’ हा चित्रपट ब्रिटिश अभिनेत्री डेझी एडगर जोन्सला देखील ऑफर करण्यात आला होता.

पण अभिनेत्री डेझी एडगर जोन्सने या चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर ‘RRR’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची भेट घेतली व तिला या चित्रपटाची कथा ऐकवली. कथा ऐकल्यानांतर लगेचच अभिनेत्री आलिया भट्टने या चित्रपटात सीतेची भूमिका करण्यास होकार दिला. अभिनेत्री आलिया भट्टने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.

महत्वाच्या बातम्या :-
कोरोना कॉलरट्युनपासून मिळणार सुटका, ‘या’ कारणामुळे सरकारने दिले बंद करण्याचे आदेश
१ लाखाच्या हुंड्यासाठी घरातून बाहेर काढलं, सुनेनं स्वत:च्या हिंमतीवर उभा केला ६० लाखांचा व्यवसाय
VIDEO: करिश्मा कपूरने फेमस निरमा ऍडला पुन्हा केलं रिक्रिएट, ९० च्या दशकातील आठवणी झाल्या ताज्या

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now