आलियाने सांगितला व्हॅलेंटाईन डेचा वाईट अनुभव; माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला बाहेर नेले होते आणि माझ्यासोबत…

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपुर यांच्या अफेरबाबत खुप चर्चा होत असते. तसेच आलिया नेहमीच आपल्या रिलेशनबाबत मीडियामध्ये बिंधास्त बोलत असते.

रणबीर कपुरच्या आधीही आलियाने काही मुलांना डेट केले आहे. अशातच आता तिने कॉफी विथ करण या शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल केला आहे.

आलिया भट्ट कॉफी विथ करण या शोमध्ये अभिनेत्री परिणीती चोपडासोबत पोहचली होती. त्यावेळी आलियाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्यासोबत खुप चुकीचा वागला होता, असे आलियाने या शोमध्ये म्हटले आहे.

शोमध्ये आलिया आणि परिणीती चोपडासोबत सिंगल असण्याच्या मुद्यावरुन चर्चा करत होत्या. त्यावेळी आलियाने म्हटले कि मला न्यु ईयर पार्टी आणि व्हॅलेंटाईन डे आवडत नाही. कारण व्हॅलेंटाईन डेचा खुप खराब अनुभव मला आला आहे.

माझा बॉयफ्रेंड व्हॅलेंटाईनला मला बाहेर घेऊन गेला होता. पण त्याने पुर्णवेळ माझ्याशी बोलणे टाळले. मला वाटतं जेवढा आपल्याला हा दिवस खास वाटतो. तेवढा हा दिवस खास नसतो, असे आलिया भट्टने या शोमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर परिणीती म्हणाली तु त्याला काही विचारले नाही का? तेव्हा आलिया म्हणाली, तेव्हा मी लहान होते. मग परिणीती हसत म्हणाली, त्यामुळेच तो काही बोलला नाही, कारण तु काही केलेच नाही.

आलियाच्या लहानपणीचे प्रेम एवढे चांगले नसले, तरी सध्या ती रणबीर कपुरसोबत खुप आनंदी दिसत असते. आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी ब्रम्हास्त्र या चित्रपटाची शुटींग चालू असताना सुरु झाली होती. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या किती मानधन घेतात ‘इंडिअन आयडल १२’ चे परीक्षक नेहा, विशाल आणि हिमेश रेशमिया?
रात्री झोपण्यापूर्वी ‘दुधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
झोपण्यापूर्वी उशीखाली लिंबू ठेवल्यास आयुष्यातील ‘या’ त्रासांपासून नक्की मुक्ती मिळवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.