Share

लग्नाआधीच आलिया भट गर्भवती? प्रेग्नसींच्या बातमीवर कपूर कुटुंबाची धक्कादायक प्रतिक्रीया

बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावर रणबीर कपूरच्या कुटूंबातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनेत्री आलिया भट्टला शुभेच्छा दिल्या आहेत.(Alia Bhatt pregnant before marriage? The Kapoor family’s first reaction)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आई होणार असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लग्नापूर्वीच गरोदर होती का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर विचारला जात आहे.

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूरने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धीमा कपूरने अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा एकत्र असलेला एक फोटो सोशल मीडियावर स्टोरीवर शेअर केला आहे. ‘माझ्या बाळांना बाळ होणार आहे…”, असे रिद्धीमा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने देखील अभिनेत्री आलिया भट्ट शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. दिग्दर्शक करण जोहरने स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “या दोघांसाठी खूप सारं प्रेम… माझ्या मुलीला बाळ होणार आहे. मी माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही.”

अभिनेत्री मौनी रॉयने अभिनेत्री आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “‘ओम नमः शिवाय, खूप आनंदी आहे.” अभिनेत्री प्रियांका चोप्रा, बिपाशा बासू, अभिनेता टायगर श्रॉफ यांनी अभिनेत्री आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता रणबीर कपूरला कुटूंबाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना अभिनेता रणबीर कपूरने सांगितले होते की, “‘मला आता खूप काम करायचं आहे, कुटुंब आहे, त्यांच्यासाठी काम करायचं आहे. पूर्वी मी स्वतःसाठी काम करत होतो. आता मी माझ्या कुटूंबासाठी काम करेन.” अभिनेता रणबीर कपूरच्या या वक्तव्यानंतर आलीय भट्ट आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानातही सत्ताबदल? आॅपरेशन लोटसला सुरवात…
शिवसेनेला आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
..म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो भाजपमध्ये या, आयुष्य सुखकर होईल; नितेश राणेंनी दिले होते आमंत्रण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now