लग्नाचे नाव काढल्यानंतर आलिया भट्टला बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी देतात महेश भट्ट

आलिया भट्टने खुप वेळात बॉलीवूडमध्ये यश मिळवले आहे. २०१२ मध्ये बॉलीवूडमध्ये लाँच झालेली आलिया आत्ता बॉलीवूडची सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे.

आलिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत आहे. ती तिच्या आणि रणबीर कपूरच्या अफेअरमूळे चर्चेत आली आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. पण दोघांनी आत्तापर्यंत याबद्दल काहीही खुलासा केला नाही.

बॉलीवूडमध्ये आल्यापासून आलियाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. पण तिच्या लग्नाच्या चर्चा मात्र फक्त रणबीर कपूरसोबत होत आहेत. दोघांचे नाते सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

रणबीर आणि आलिया ह्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जाते आहे. दोघेही लग्नासाठी तयार आहेत. रणबीरच्या घरातून या नात्यासाठी होकार मिळाला आहे.

पण आलिया भट्टच्या घरात मात्र लग्नाला विरोध होत आहे. हा विरोध आलियाच्या वडिलांकडून होत आहे. महेश भट्टची इच्छा नाही की, त्यांच्या मुलीने एवढ्या लवकर लग्न करावे. त्यांना आलिया लग्नासाठी खुप छोटी वाटते.

महेश भट्टला रणबीर आणि आलियाच्या नात्याची अडचण नाही. पण दोघांनी लवकर करावे असे त्यांना वाटतं नाही. लग्नासाठी दोघे लहान आहेत. असे त्यांचे मत आहे. म्हणून ते आलियाच्या लग्नाला विरोध करत आहेत.

आलियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘वडिलांचे माझ्यावर खुप प्रेम आहे. त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. पण ते मला लवकर लग्न करू देणार नाहीत. लग्नाचे नाव काढल्यानंतर ते मला बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी देतात’.

आलियाच्या या खुलास्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कोणाचे वडील असे कसे वागू शकतात. असे लोकांना वाटत आहे. यावर आलिया म्हणाली की, ‘ते चुकीचे नाहीत. त्यांचे आमच्यावर खुप प्रेम आहे. लग्न करून आम्ही त्यांच्यापासून दुर जाऊ नये असे त्यांना वाटते’.

महत्त्वाच्या बातम्या –

युपी बिहार लुटण्याच्या चक्करमध्ये कोर्टात पोहोचले होते शिल्पा शेट्टी आणि गोविंदा

जुही चावलाने स्वतःच्याच हाताने केले होते स्वतःचे नुकसान; करिश्मा कपूरला बनवले स्टार

ज्या अभिनेत्याला ओळखत नाही म्हणून हाकलून दिले होते; पुढे जाऊन त्यानेच राजेश खन्नाचे स्टारडम हिसकावून घेतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.