Share

लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. होय, सोमवारी सकाळी स्वत: आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ती गर्भवती असल्याचा खुलासा केला आहे. या फोटोमध्ये आलिया रणबीरसोबत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे.(Alia Bhatt, Good News,, Ranbir Kapoor, Pregnant)

लव्हबर्ड्स स्क्रीनकडे पाहत आहेत, जिथे हृदय बनले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.” सोनोग्राफी फोटोसोबतच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सिंह आणि सिंहिणी त्यांच्या पिल्लांसह दिसत आहेत.

निसर्गावरील प्रेम सांगून या जोडप्याने हे स्पष्ट केले आहे की दोघे लवकरच आई-वडील होणार आहेत. ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला असतानाच आता ‘शमशेरा’च्या प्रमोशनदरम्यान रणबीरने याबाबतचे संकेत दिले होते. होय, प्रमोशनच्या वेळी जेव्हा त्याला विचारण्यात आले की लग्नानंतर आणखी किती काम करणार आहे.

तेव्हा तो म्हणाला, “सर मला आता खूप काम करायचे आहे. आता मला कुटुंब बनवायचे आहे .” रणबीर आणि आलियाने यावर्षी १४ एप्रिल रोजी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. आणि आता दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आहे.

लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल रणबीर म्हणाला, “मी चित्रपटांमध्ये म्हणायचे की ‘लग्न हे मरेपर्यंत डाळ-भातासारखं असतं आणि जोपर्यंत तुम्ही मरत नाही आणि आयुष्यात थोडं तंगडी कबाब, हक्का नूडल्स’  असाव.  पण बॉस, या अनुभवानंतर मी म्हणेन की डाळभात सर्वोत्तम आहे. आलिया माझ्या डाळभात वरचा तडका आहे, अचार आहे, कांदा आहे, जे काही आहे सगळ तीच आहे.”

महत्वाच्या बातम्या
शिंदे गटातून मोठी माहिती समोर, केसरकरांनी सांगितले तीन महत्वाचे मुद्दे
लग्नाच्या दोनच महीन्यांनंतर आलिया भट्ट आई होणार? स्वतःच फोटो शेअर करून दिली गुड न्युज
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now