अजबच! आता कोरोनावर दारू ठरतेय प्रभावी, ‘या’ डॉक्टरने केला विचीत्र दावा

सध्या सगळीकडे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. यामुळे देशावर मोठे संकट आले आहे. यावर अजूनही प्रभावी औषध आले नाही. यामुळे लस हाच काहीसा पर्याय यावर आहे, मात्र लसीकरणाचा देखील देशात मोठा तुटवडा जाणवत आहे. असे असताना आता कोरोनावर एक प्रभावी औषध असल्याचा दावा केला जात आहे.

कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत ४० ते ५० जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचे औषधी प्रमाण घेण्यास सांगतिले. यामुळे त्यांच्या व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

यामुळे ४० ते ५० पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी १० रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले. आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असे अरुण भिसे यांनी सांगितले आहे. यामुळे दारू खरचं गुणकारी आहे का.? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तोंडाची चव जाईल, आणि जेवण कमी होईल, त्या दिवसापासून अल्कोहोल ज्यामध्ये ४० टक्के पेक्षा जास्त आहे, देशी दारु, व्होडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारी ३० मिली आणि ३० मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचे आहे.

मात्र पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचे मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे, असे आवाहन डॉ. अरुण भिसे यांनी केले आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज

लग्नाच्या ९ वर्षानंतर घरात पाळणा हालला; पण मुलीच्या जन्मानंतर चार दिवसातच आईवडिलांना कोरोनाने हिरावले

इथेही फिक्सींग! ‘खतरों के खिलाडी ११’ चा विजेता कोण असणार हे अभिनेत्रीने स्पर्धेआधीच सांगीतलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.