याला म्हणतात कट्टर! दारूच्या किंमती वाढल्या म्हणून दारूड्याने केले पोलिस स्टेशनसमोर आंदोलन

केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात त्यांनी कृषी, शैक्षणिक, उद्योग, आरोग्य, वाहतुक अशा सर्व क्षेत्रांसाठी घोषणा केल्या आहेत. त्यांनी विदेशी दारूवर १०० टक्के कर लावणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे दारूच्या किंमतीत वाढ होऊन किंमती दुप्पट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे मध्यप्रेमींच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

आंध्रप्रदेशातील कुप्पम येथे अशाच एका तळीरामाने दारूच्या वाढत्या दरामुळे चक्क पोलिस स्टेशन समोरचं आंदोलन करण्यास सूरूवात केली आहे. त्याच्या या आंदोलनाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती पोलिस स्टेशन समोर ठाण मांडून बसला आहे. तो रस्त्याच्या मधोमध मांडी घालून बसलेला आहे. त्याच्या आजूबाजूने वाहनं जाताना दिसत आहेत. तो दारूच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी करत आहे.

त्याचं असं म्हणणं आहे की, केंद्र सरकारने दारूच्या वाढवलेल्या किंमतीमुळे त्याच्या खिशावर ताण पडत आहे. दारू पिण्याच्या सवयीमुळे त्याला रोज दारू प्यायला लागते. त्याचं आंदोलन कितपत यशस्वी ठरतयं, त्याच्या मागणीकडे सरकार लक्ष देतयं का? ते पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

म्हत्वाच्या बातम्या-
फँड्री चित्रपटातील जब्याची शालू आता दिसतेय अशी, फोटो पाहून थक्क व्हाल
लग्नाआधीच सुरू झाला रोमान्स! माझा होशील ना मधील सई-आदित्यचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला लुबाडणाऱ्या मोदी सरकारची रोहित पवारांनी थेट पुरावे देत केली पोलखोल
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.