सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अशी ज्ञानेश्वरी’ हा मराठी चित्रपट (प्रमाणपत्र १९९८) त्याकाळी फारच लोकप्रिय झाला होता.
या दोघांव्यतिरिक्त कुलदीप पवार, सुहास पळशीकर,सयाजी शिंदे, नंदू कुमार यांच्या देखील यात महत्वाच्या भूमिका होत्या. या कलाकारांनी चित्रपटात विरोधी भूमिका केली असली तरी चिमुरड्या ज्ञानेश्वरीमुळे त्याच्या आयुष्यात कसे कायापालट घडून आले आहे हे दाखवले होते.
‘अशी ज्ञानेश्वरी’ चित्रपटातील बालभूमिकेतील चिमुरडी ज्ञानेश्वरी आता काय करते किंवा सध्या काय करते जाणून घेऊ. ज्ञानेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे अक्षता नाईक. ‘अशी ज्ञानेश्वरी’ या चित्रपटाचे निर्माते अरविंद नाईक यांची हि कन्या.
कमी टीआरपीमुळे सावित्री ज्योती मालिका अखेर बंद
निर्माते अरविंद नाईक याना अक्षता आणि अक्षया अश्या दोन मुली. अक्षता ‘अशी ज्ञानेश्वरी’ या चित्रपटानंतर सिनेमा क्षेत्रात दिसली नसली तरी धाकटी बहीण अक्षया हिने अनेक मालिकां मध्ये काम केले.
अक्षया सध्या कलर्स मराठी वरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्या पात्राचे नाव लतिका असून अत्यंत संस्कारी आणि खंबिर मुलीचे पात्र ती निभावते.
माझ्या नवऱ्याची बायको; मालिकेतील शनाया सोडणार मालिका; कारण ऐकूण थक्क व्हाल
तसेच या मालिकेत रंग-रूप तसेच जाडी या पेक्षा मनाने सुंदर असणे गरजेचे आहे असे दर्शवले आहे. या मालिकेच्या पात्रामधून अक्षया अनेक प्रेक्षकांच्या मनामना मध्ये पोहचली आहे. या मालिकेपूर्वी अक्षयाने ये रिश्ते हे प्यार के ,ये रिश्ता क्या केहलता है यांसारख्या हिंदी फेमस मालिकांमध्ये काम केलेले दिसून येते.
मराठी मधील हि तिची पहिलीच मालिका आहे. याशिवाय तिने फिट इंडिया या चित्रपटही काम केले आहे. अक्षता पेक्षा तिची धाकटी बहीण अक्षयाचा अभिनय क्षेत्रात चांगलाच जम बसलेला दिसून येतो.
खऱ्या आयुष्यात अशी दिसते सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका
अक्षताचे सध्या लग्न झाले असून ती कुटूंबासोबत मुंबईत स्थायी आहे. अक्षता आणि अक्षया दोघीना डान्सची विशेष आवड आहे. दोघींचे डान्सचे विडिओ सोसिअल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण