VIDEO: पाठकबाईचा राऊडी अंदाज; बुलेटसोबत केले ‘असे’ काही की चाहते झाले हैराण

पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख बनवली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तिने सर्वत्र आपली छाप टाकली आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी खुपच प्रसिद्ध झाली होती.

काही महिन्यापुर्वी मालिका संपली असली, तर या मालिकेचे क्रेझ अजूनही तसेच आहे. तसेच अक्षया अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.

अक्षया ही सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक राऊडी व्हिडिओ अक्षयाने शेअर केला आहे.

अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला राऊडी अंदाजातील हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. तसेच हा व्हिडिओ खुप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने मीट नेत्रा असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षया बाईक राईडींग करताना दिसत आहे. राऊडी अंदाजामध्ये ती रॉयल इनफिल्डवर राईडिंग करत आहे. अक्षया लवकरच आपल्यासाठी एक ऑडीओ स्टोरी घेऊन येणार आहे.

सायली केदारने लिहिलेली कथा आपल्याला लवकरच अक्षयाच्या आवाजामध्ये ऐकायला मिळणार आहे. ही कथा स्टोरी टेल मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कॉलेजच्या वेगवेगळ्या झोलवर ही कथा असल्यामुळे या कथेचे नाव झोलर असे आहे.या कथेत नेत्रा नावाच्या एका राऊडी मुलीचे पात्र ती साकारणार आहे. काही दिवसांपुर्वीच अक्षयाने या स्टोरीबद्दल माहिती दिली होती.

दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडिओला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काहीच तासांमध्ये या व्हिडिओ ४५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे, तर ९ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

https://www.instagram.com/reel/CQdATBNiDi8/?utm_source=ig_embed&ig_rid=1330ae22-76b4-44ac-a4dd-cf57a538ea50

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी
बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला
स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ, म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.