अरुण गवळी होणार आजोबा; लेकीने फोटो शेअर करत दिली गोड बातमी

मुंबई | अरुण गवळीची कन्या योगिता गवळी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे २०२० रोजी लग्न बंधनात अडकले. आता गँगस्टर अरुण गवळी आजोबा होणार असल्याचे समोर आले आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगितासोबतचा फोटो शेअर केला आहे.

A grand adventure is about to begin, Waiting for our new edition…❤️ अशा कॅप्शनसह अक्षयने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये योगिताने लाँग गाऊन परिधान केला आहे तर अक्षयने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी ५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लॉकडाउनच्या कळात ते दोघे लग्न बंधनात अडकले.

दरम्यान, अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. विशेष बाब म्हणजे ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या
स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का? ‘हे’ उपाय करुन पाहा
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.