रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट राम सेतूच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान तो आपल्या सहकलाकारांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. पण आता अक्षयने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

खरंतर, व्हिडीओमध्ये अक्षय कुठेतरी हरवलेला दिसत आहे. यावेळी वाऱ्यामुळे त्याचे केस विखुरले आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नमस्तसाय नमो नमः हे धार्मिक गाणे वाजत आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, ‘हो… आज आईला खूप मिस करत आहे.’ यासोबतच अक्षयने तुटलेल्या हृदयाचा इमोजी वापरला आहे.

या वर्षी ८ सप्टेंबर रोजी अक्षयची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले. आईच्या निधनाची माहिती देताना अक्षयने ट्विट केले होते की, ती माझी ताकद होती आणि आज तिच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे. माझी आई अरुणा भाटिया आम्हा सर्वांना सोडून माझ्या वडिलांना भेटणार आहे.

अक्षयची आई काही दिवसांपासून आजारी होती आणि तिची प्रकृती अधिकच नाजूक झाल्यावर अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेलेला असताना आईला भेटण्यासाठी भारतात आला. मात्र, अक्षय आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या आईचे निधन झाले.

अक्षयने आईसोबतच्या नात्यावर भाष्य केले. २०१५ मध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने त्याच्या आईसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, माझ्या आणि आईमध्ये खूप प्रेमळ आणि मजबूत नाते आहे. आमच्यामध्ये काहीही येऊ शकत नाही. अक्षय म्हणाला होता की, आम्ही कितीही दूर असलो तरी मनापासून नेहमीच जवळ असतो. तिच्याशिवाय मी काही नाही.

अक्षय सध्या आगामी चित्रपट दमणमध्ये राम सेतूचे शूटिंग करत आहे. त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अक्षय पृथ्वीराज, रक्षाबंधन, अतरंगी रे आणि बच्चन पांडे या चित्रपटातही दिसणार आहे.

नुकताच ‘पृथ्वीराज’चा टीझर रिलीज झाला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे अक्षय आणि मानुषीचा एकत्र अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या
समीर वानखेडेंनी आपल्या पहिल्या पत्नीलाही नाही सोडले, मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप
ज्ञानदेव वानखेडे हिंदूच; क्रांती रेडकरने समीर वानखेडेंचा जन्मदाखलाच दाखवला
खरंच मुख्यमंत्री शिवराज सिंहांना मोदींच्या फ्रेममध्ये येण्यापासून रोखलं? जाणून घ्या सत्य..
नावावर ११७ पावत्या तरी बिंधास्त चालवत होता गाडी, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर भरावा लागला ‘इतका’ दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.