अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ने बंटी और बबली २ ला टाकले मागे, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा दुसरा आठवडा सुरू आहे, मात्र कमाईच्या बाबतीत कोणतीही कमतरता नाही. रोहित शेट्टीला ब्लॉकबस्टर दिग्दर्शक का म्हटले जाते, हे यावरून स्पष्ट होते. चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर चित्रपट लवकरच 250 कोटींचा टप्पा पार करेल.

तसेच अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘सूर्यवंशी बॉक्स ऑफिस कलेक्शन’ने पहिल्या आठवड्यातच 120 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, चौदाव्या दिवशी ‘सूर्यवंशी’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या दिवशी त्याचा आकडा 3.10 कोटी इतका आहे.

या आठवड्यात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांचा चित्रपट ‘बंटी और बबली 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत, सूर्यवंशीच्या कमाईवर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल कारण ‘बंटी और बबली 2’ हा एक कॉमेडी चित्रपट आहे आणि त्याचा पहिला भाग देखील खूप सुपरहिट होता.

हा चित्रपट दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी सुमारे 3500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. सूर्यवंशीने 26.29 कोटींची ओपनिंग घेतली आणि ओपनिंग वीकेंडमध्ये 77.08 कोटी कमावले.

चित्रपटाने पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आणि पहिल्या आठवड्यात 120.67 कोटी कमावले. १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या वीकेंडमध्ये, सूर्यवंशीने 30.57 कोटींचे निव्वळ कलेक्शन केले, त्यानंतर 10 दिवसांचे कलेक्शन 151.23 कोटींवर गेले.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय आणि कतरिना व्यतिरिक्त अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील दिसले होते.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.