Akshay Kumar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे. ९ सप्टेंबर १९६७ रोजी त्याचा जन्म झाला. तो आज त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय कुमार चित्रपटांमध्ये काम करत आहे.
अक्षय कुमारच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली. त्यांनतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. अक्षय कुमारला ‘खिलाडी’ या नावानेदेखील ओळखले जाते. त्याने खिलाडी नाव असलेले जवळपास ८ चित्रपट केले आहेत. त्यामुळे त्याला खिलाडी असेही संबोधले जाते.
प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना ही अक्षय कुमारची पत्नी आहे. तीसुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. अक्षयच्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये त्याला अनेक वादग्रस्त प्रकरणांचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत तो अनेक मुद्द्यांवरून वादात सापडला आहे.
यातलेच एक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पँटची झिप उघडण्याचा प्रकार. हे प्रकरण खूप गाजले होते. यामुळे त्याला चाहत्यांकडून नाराजीही सहन करावी लागली होती. अक्षयचे चाहते या सर्व प्रकरणांमुळे आश्चर्यचकित झाले होते.
ही घटना अशी की, २००९ मध्ये अक्षय कुमारने एका रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्ना हिला त्याच्या पँटची झिप उघडायला सांगितली होती. त्यामुळे अक्षय कुमारचे हे कृत्य अश्लील असल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्याचे झाले असे, अक्षय कुमार रॅम्पवॉक करत असताना पत्नीसमोर जाऊन उभा राहिला. त्यावेळी त्याची पत्नी प्रेक्षकांमध्ये बसली होती. त्यानंतर ट्विंकलनेही मागेपुढे न बघता पतीच्या पँटची झिप उघडली. अक्षयच्या या कृत्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता.
यासोबतच कॉमेडियन मल्लिका दुआ हिनेसुद्धा अक्षय कुमारने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तसेच अक्षय कुमारने तो कोणत्याही प्रकारची नशा करत नसल्याचा दावा केला होता. परंतु, अलीकडेच त्याने एका गुटखा कंपनीची जाहिरात केली तेव्हा लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली होती.
त्यांनतर त्याने जनतेची माफी मागितली आणि भविष्यात कधीही अशा जाहिराती करण्याची चूक करणार नसल्याचे सांगितले. तसेच अक्षय कुमारचे नुकतेच प्रदर्शित झालेले सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या सिनेमांवर बॉयकॉट ट्रेंडही चालवला गेला.
महत्वाच्या बातम्या
Share Market : १५ दिवसांत पैसे झाले दुप्पट! ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Satara : आता राजेच राजांचा कडेलोट करणार? साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील चिघळलेला वाद पोहचला कडेलोटापर्यंत
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल
Nashik: नाशिकमधील ७ लहान मुले गायब, खरी माहितीसमोर येताच पोलिसांसहीत सगळेच हादरले