Marathi Movie : नुकतीच “वेडात मराठे वीर दौडले सात” या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आहेत. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या सात मावळ्यांवर आधारित हा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटातील एका भूमिकेने चित्रपटावर टीका करण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा या चित्रपटात छ्त्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. परंतु, महेश मांजरेकर यांची ही निवड प्रेक्षकांना फारशी रूचलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर यावरून प्रचंड टीका टिपण्णी करण्यात येत आहेत.
या भूमिकेसाठी मराठी कलाकार न निवडता एखादा बॉलिवूडचा कलाकार का निवडला? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. यावर एका नेटकऱ्याने लिहिले की, “मराठी चित्रपटाला भीक लागली वाटतं. अक्षय कुमार आणि छ्त्रपती कसं जमणार. भिकेचे डोहाळे. छ्त्रपती हे फक्त नाव नाही विषय काळजाचा आहे. फक्त अभिनय करायची हौस भागवायची असेल तर तो हा विषय नाही,” असे म्हटले आहे.
तसेच एका युजरने “माती खाल्ली…. आपले मराठी कलाकार नाही दिसले का? असा सवालही केला आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरून अक्षय कुमार आणि महेश मांजरेकर यांना ट्रोल केले जात आहे. “वेडात मराठे वीर दौडले सात” हा चित्रपट २०२३ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात बिग बॉस मराठी फेम विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे तसेच हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर आणि प्रवीण तरडे हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट मराठीतील दुसरा बहुभाषिक चित्रपट आहे.
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता या चित्रपटात अक्षय कुमारच्या छ्त्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Virat Kohli: विराट कोहलीवर गंभीर आरोप, बांगलादेशविरोधात केली फेक फिल्डींग, पंचांनी दुर्लक्ष केलं नाहीतर..
VIDEO: जड ओझं वाहून नेणाऱ्या हातगाडीला बसचालकाने अशी केली मदत, लोकांचं जिंकलं मन
India : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं; आता ‘असं’ असेल सेमी फायनलसाठीचं समीकरण
VIDEO: ना हिंदू, ना मुसलमान, हा आमचा शाहरूख खान, चाहत्याचे बोलणे ऐकून शाहरूखने मारली मिठी