अक्षय कुमारने स्वत:च्या मुलांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय; मुलांना नाही मिळणार…

दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर अनेक जणांनी बॉलीवूडच्या घराणेशाहीवर आवाज उठवला. काहींनी त्याला पाठिंबा दिला काहींनी त्याला विरोध केला. आता खिलाडी अक्षय कुमारनेही आपली बाजू स्पष्ट केली आहे.

अक्षय कुमार म्हणाला की, “घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबियांना काम देण्यापासून थांबवू शकत नाही. आई वडिलांच्या ओळखीवर कोणालाही काम मिळू शकते”.

“काम कोणतेही असो त्या कामात टिकून राहण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला बॉलीवूडमध्ये पाहायला मिळतील”, असं अक्षय कुमार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे. त्याने आपल्या मुलांबद्दलही सांगितले आहे.

“आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. त्यांना जर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा किंवा माझ्या ओळखीचा मुळीच फायदा मिळणार नाही.

“आरव आणि नितारा यांनी स्वतः कष्ट करावे स्वतः ऑडिशन द्यावे आणि कामे मिळवावी, अशी माझी अपेक्षा आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशाचा आनंद त्यांना कळणार नाही”,असं तो म्हणाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.