अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयामुळे नेहेमी चर्चेत असतो. तसेच तो लोकांना मदत देखील करत असतो. अक्षय कुमारने आजवर अनेक हिट चित्रपटातून काम केले आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

अक्षय कुमारची बहिण अलका भाटिया यांच्याबद्दल अनेकांना अनेक गोष्टी माहीत नाहीत. ती अनेकदा अक्षय कुमार सोबत अनेक बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसत असते. ती एक व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते.

अलका भाटिया हिने नुकतेच लग्न केले आहे. यामुळे आता त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षे मोठ्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे. हा व्यक्ती पहिले पासून घटस्फोटीत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगण्यात येते. या लग्नाला अक्षय कुमारचा प्रचंड विरोध होता. तरी देखील अलका यांनी लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव सुरेंद्र हिरानंदानी असे आहे. ते एक यशस्वी उद्योगपती आहेत. हिरानंदानी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाचा या लग्नाला मात्र पाठिंबा होता. ट्विंकल खन्नामुळेच अक्षय कुमार शेवटी या लग्नासाठी तयार झाला. अखेर या दोघांचे लग्न झाले, आता ते आपल्या भावी आयुष्यात आनंदी आहेत.

मात्र अक्षय कुमारचा विरोध पाहता हे लग्न होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची समजूत काढण्यासाठी अनेक दिवस गेले. अलका यांनी यापूर्वी फुगली या चित्रपटाची निर्मिती केली होती. नंतर त्या व्यवसायाकडे वळाल्या.

ताज्या बातम्या

पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ

“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.