अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे  पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्राची गती रोखली गेली आहे. बर्‍याच चित्रपटांचे शूटींग ठप्प झाले असतानाच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनावरुन एक संकट उभे राहिले आहे.

‘बेल बॉटम’ चित्रपटाचे निर्माते जॅकी भगनानी यांनी २८ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची घोषणा केली. पण सध्याच्या पस्थितीमुळे आता ओटीटीवर ‘बेल बॉटम’ रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट २०२८ मधील मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. निर्माते प्रेक्षकांना यापुढे प्रतीक्षा न करायला लावता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज करण्याचा सौदा जवळजवळ निश्‍चित झाला आहे. अद्याप रिलीजची तारीख निश्चित केलेली नाही.

हॉटस्टारच्या अगोदर अमेझोन  प्राइमशी रिलीजबाबतही चर्चा झाली होती. दरम्यान, अशी बातमी आहे की हॉटस्टारने अधिक पैशांची ऑफर केली आणि हा चित्रपट त्यांना मिळाला. हा करार कितीला  केला गेला हे उघड  करण्यात आलेल नाही, पण हे नक्की आहे की हा करार चांगल्या पैशात झाला असावा. अक्षय कुमारसह वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि आदिल हुसेन हे सगळे  चित्रपटात दिसणार आहे.

‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होणे हा करार घाट्यात मानले जाते. या प्लॅटफॉर्मवर निर्माता इच्छित रक्कम मिळवू शकत नाही. याच कारणास्तव अक्षय कुमारचा बिग बजेट चित्रपट ‘सूर्यवंशी’ एका वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रतीक्षा करत आहे. १०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट आहे.

हे ही वाचा-

अजबंच! ही चित्रपट निर्माती चक्क खाली डोकं वर पाय करुन बसली गाडीत; पहा व्हिडिओ

कोरोनामुळं आमच्या आयुष्याची वाट लागलीय आणि इथं लोकं आयपीएल खेळतायत; अभिनेत्री भडकली

शरीर पिळदार असले तरी कोरोना कोणाला सोडत नाही; मिस्टर इंडिया जिंकलेल्या बॉडीबिल्डरचे निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.