अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, रडून रडून झाला बेहाल; केली ‘अशी’ भावनिक पोस्ट

मुंबई । बॉलीवूडमधून सध्या एक दुःखद बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना या दुःखद बातमीची माहिती दिली आहे. यामुळे अक्षय कुमारच्या कुटूंबावर दुःख कोसळले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी आई अरुणा भाटियासाठी प्रार्थना करण्याचे चाहत्यांना आवाहन करणारा अक्षय कुमारने जड अंतःकरणाने चाहत्यांना सोशल मीडियावर ही माहिती दिली. यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

अक्षयने पोस्ट करून म्हटले की, ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने दुःख व्यक्त केले आहे.

अरुणा भाटिया यांची प्रकृती अनेक दिवसांपासून गंभीर होती. याच कारणामुळे त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या विनंतीवरून रुग्णालयाने अरुणा भाटियाच्या उपचाराचा तपशील लपवून ठेवला आहे. अक्षयच्या आईला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी मिळताच अक्षय लंडनहून मुंबईला परतला.

अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याच्या आईने या जगाला निरोप दिला. अक्षयने मंगळवारीच चाहत्यांना त्याच्या आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. अक्षयने लिहिले होते, ‘तुम्हा सर्वांना माझ्या आईची काळजी करताना पाहून मी खूप भावुक झालो आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. आपल्या सर्व प्रार्थना आवश्यक आहेत.

ताज्या बातम्या

आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का? मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासमोरच सवाल…

दुख:द बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन; वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास

..तरच तिसरी लाट रोखता येऊ शकते; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगीतला नामी उपाय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.