Share

देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) महान योद्धा पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सोनू सूद आणि अभिनेता संजय दत्त यांची देखील ‘पृथ्वीराज’ चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.(akshay kumar demand to government to show pruthviraj film in every school in country)

या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारणार आहे. नुकताच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटासंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली. “३० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत मला इतक्या मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाली नाही”, असे अभिनेता अक्षय कुमारने सांगितले.

अक्षय कुमार पुढे म्हणाला की, ” डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवली आणि मला पृथ्वीराज चौहानची व्यक्तिरेखा साकारण्यास सांगितले. माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण होता. चित्रपटात सर्व गोष्टी प्रामाणिकपणे दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात काम करून माझे जीवन यशस्वी झाले आहे. ”

“मला वाटते की प्रत्येक मुलाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना एका महान योद्ध्याची माहिती मिळेल. मला चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्यासंदर्भातील एक पुस्तक वाचण्यासाठी दिले होते. या पुस्तकातून मला कळले की पृथ्वीराज चौहान किती महान योद्धा होते”, असे अभिनेता अक्षय कुमारने सांगितले.

अभिनेता अक्षय कुमारने पुढे सांगितले की, “भारतातीलच नाही तर जगभरातील प्रत्येक मुलाने ‘पृथ्वीराज’ चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. हा एक शैक्षणिक चित्रपट आहे. देशातील प्रत्येक मुलाला पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास माहित असावा. मी सरकारला विनंती करतो की प्रत्येक शाळेमध्ये हा चित्रपट दाखवणे सक्तीचे करावे”, असे देखील अभिनेता अक्षय कुमारने सांगितले आहे.

“हा चित्रपट मी ४२ दिवसांमध्ये पूर्ण केला आहे. मी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी देखील या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत”, असे अभिनेता अक्षय कुमारने सांगितले. ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होणार आहे. यशराज स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंचा बाप सुद्धा माफी मागितल्या शिवाय अयोध्येत येऊ शकत नाही; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
डॉक्टरेट सोडून अभिनेता होण्यासाठी आला होता मुंबईत, आता पृथ्वीराजमध्ये ‘मोहम्मद घोरी’ बनून सगळ्यांवर पडतोय भारी
लॉक अप जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचे डोंगरी येथे जल्लोषात स्वागत, ट्रॉफी फिरवत म्हणाला..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now