‘ती चूक मी का केली?’ मिल्खा सिंग यांच्याबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा

मुंबई । नुकतेच भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग याचे निधन झाले. यामुळे अनेकांना धक्का बसला. जगात ते नावाजलेले खेळाडू होते. त्यांच्यावर आधारित चित्रपट देखील आला होता. भारताचे फ्लाइंग सिख म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत असतो. परंतु असे असताना देखील एक भूमिका नाकारल्याची खंत कायम त्याच्या मनात राहील. ती भूमिका होती खुद्द मिल्खा सिंग यांची.

मिल्खा सिंग यांच्यावर अभिनेता फरहान अख्तर याने बायोपिक तयार केला होता. या भूमिकेसाठी आधी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षयने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचा उल्लेख केला. ती भूमिका नाकारल्याची खंत व्यक्त केली.

यामध्ये अक्षयने, मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला. चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळणार होती. परंतु त्या चित्रपटाला मी नकार दिला. ही खंत कायम माझ्या मनात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना! असे म्हटले आहे.

मिल्खा सिंग हे एक महान धावपटू होते. त्यांच्यावर आलेल्या चित्रपटामुळे ते अजूनच चर्चेत आले होते. त्यांची भूमिका साकारण्याची संधी त्यांना आली होती. मात्र ती नाकारली. यामुळे अक्षयने आता दुःख व्यक्त केले आहे.

अक्षयने आपले दु:ख व्यक्त केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बोलीवूडमधून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

आर्याला असं अडकवणार डॉक्टर स्वतःच्या जाळ्यात; देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट

काय सांगता! विवाहित असलेला पुरुष गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, आणि….

मोठी बातमी! तीन न्यूज चॅनेल्सना दंड, माफी मागण्याचे निर्देश, तबलिगी प्रकरण आले अंगट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.