‘या’ कारणामुळे बाॅलीवूडची सर्वात हिट जोडी अक्षयकुमार-सुनील शेट्टी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते

आपण रोज नवनवीन व्यक्तींना भेटत असतो. पण अनेक वेळा आपली त्यांच्यासोबत भांडण होतात. कारण आपल्याला काहीतरी गैरसमज झालेला असतो. एका गैरसमजामुळे आपण भांडण करतो. पण नंतर आपल्याला समजते की, आपल्याला गैरसमज झाला होता. आपण भांडण करायला नको होतं.

असाच एक किस्सा बॉलीवूडमध्ये खुप जास्त प्रसिद्ध आहे. हा किस्सा आहे अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीचा. सुरुवातीला या दोघांमध्ये खुप मोठे भांडण झाले होते. पण नंतर मात्र त्यांना आपली चुक समजली आणि त्यानी एकमेकांशी मैत्री केली.

अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीने पहिल्यांदा ‘वक्त हामारा है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण त्यांनतर त्यावेळी हे दोघेही बॉलीवूडमध्ये नवीन होते. त्यामूळे या दोघांसाठी प्रत्येक सीन आणि प्रत्येक चित्रपट खुप महत्त्वाचा होता.

कारण हेच चित्रपट त्यांचे भविष्य ठरवणार होते. वक्त हामारा है’ चित्रपटासाठी या दोघांनी खुप मेहनत केली होती. दिवस रात्र शुटिंग केली होती. पण हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा या दोघांना खुप मोठा धक्का बसला.

कारण या चित्रपटामध्ये या दोघांचे अनेक सीन्स डिलीट करण्यात आले होते. त्यामुळे या दोघांना खुप जास्त राग आला होता. अक्षय कुमारला त्याच्या मॅनेजरने सांगितले की, सुनील शेट्टीमुळे तुझा रोल कट करण्यात आला आहे.

हे ऐकल्यानंतर अक्षय कुमारला सुनील शेट्टीचा खुप जास्त राग आला. सुनील शेट्टीने ज्यावेळी चित्रपट बघितला त्यावेळी तो पण खुप चिडला. कारण त्याने या चित्रपटासाठी एक गाणं शुट केले होते. ते पूर्ण गाणंचं कट करण्यात आले होते.

सुनील शेट्टीला समजले की, अक्षय कुमारमुळे त्याचे या चित्रपटातील गाणे कट करण्यात आले होते. सुनील शेट्टीला अक्षय कुमारचा राग आला होता. या दोघांना एकत्र काम करण्याची इच्छा नव्हती. पण अगोदरच या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र साइन केले होते.

त्यामूळे या दोघांना एकत्र काम करावेच लागणार होते. या दोघांना एकमेकांची तोंड बघण्याची इच्छा नव्हती. पण शेवटी या दोघांनी त्यांच्या चित्रपटांची शुटिंग सुरू केली. पण शुटिंग करताना निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांना शुटिंग करता येत नव्हती.

शेवटी साजिद नाडीयाडवालाने या दोघांची भांडण संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या दोघांना बोलवले आणि समोरा समोर बसवून संपूर्ण विषय समजून घेतला. त्यानंतर त्यांनी या दोघांचे गैरसमज दूर केले.

साजिद नाडीयाडवालाने सांगितले की, त्या चित्रपटामध्ये काहीही चुकीचे झाले नाही. चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार तुमच्या दोघांचे रोल कट करण्यात आले होते. म्हणून अनावश्यक गोष्टी कट करून टाकण्यात आल्या. यात तुमच्या दोघांची काहीही चुकी नाही.

त्यावेळी सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारला त्यांची चुक समजली. त्या दोघांनी एकमेकांची माफी मागितली आणि मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली. दोघांनी १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. आजही ते खुप चांगले मित्र आहेत.

महत्वाच्या बातम्या –

एकेकाळी ज्या अभिनेत्याला करिष्माने हाकलून दिले होते तो पुढे जाऊन बाॅलीवूडचा स्टार झाला

बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

कारगिल युद्धात जीवाची बाजी लावत जवानांचे प्राण वाचवणारी रणरागिनी; वाचा थरारक किस्सा

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.