अक्षय कुमारची ‘हवाई सफर’ सापडली वादात; भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश  

नाशिक । अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक त्र्यंबकेश्वर दौरा वादात सापडला आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या हवाई दौऱ्याच्या चौकशीच आदेश दिले आहेत.

अक्षयकुमारच्या वैयक्तिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असून जिल्हाधिकारी यांनी माध्यमातूनच यांसदर्भात माहिती समजली. कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली नाही, असेही ते म्हणाले.

अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अक्षय कुमारचा दौरा होता. येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग होते.

विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचे स्वागतही केले. तसेच, अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला.

शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेशही भुजबळ यांनी दिले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.