ऐश्वर्या रायमूळे आजही अविवाहीत आहे अक्षय खन्ना; सगळ्यांसमोर केले होते लग्नासाठी प्रपोज

विनोद खन्ना इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयासोबत ते त्यांच्या स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचा स्वभावा पेक्षा खुप वेगळा स्वभाव त्यांचा मुलगा अक्षय खन्नाचा आहे. अक्षय खन्नाने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख मिळवली आहे.

शांत स्वभावाचा अक्षय इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावरच इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख मिळवली आहे. अभिनयात नेहमी पुढे राहणारे अक्षय प्रेमात मात्र नेहमी मागे राहिले.

गेले अनेक वर्ष अक्षय खन्ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. पण आजपर्यंत त्यांचे नाव कोणत्याही अभिनेत्रीशी जोडले गेले नाही. त्याच्या अफेअरच्या बातम्या कधीच समोर आल्या नाहीत.

४० वर्षांचा अक्षय आजही अविवाहीत आहे. असे बोलले जाते की, अक्षय करिश्मा कपूरच्या प्रेमात पागल झाला होता. करिश्मामूळे तो आजही अविवाहीत आहे. पण खुप कमी लोकांना त्याच्या पहील्या प्रेमाबद्दल माहीती आहे.

करिश्मा कपूर अक्षयचे पहीले प्रेम नाही तर ऐश्वर्या राय त्याचे पहीले प्रेम आहे. सुभाष घईच्या ‘ताल’ चित्रपटामध्ये दोघांनी पहील्यांदा एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली होती.

त्यानंतर त्यांनी ‘आ अब लौट चले’ चित्रपटामध्ये काम केले. एवढा वेळ एकत्र घालवल्यामूळे ते एकमेकांना पसंत करु लागले होते. शांत स्वभावा अक्षय चुलबूल्या ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. त्याला ऐश्वर्यासोबत राहणे खुप आवडू लागले होते.

ऐश्वर्या देखील अक्षय आवडत होता. पण फक्त को स्टार म्हणून ऐश्वर्याला तो आवडत होता. अक्षय आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या चर्चा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होत होत्या. दोघांनी त्याकडे दुलर्क्ष केले आणि कामावर लक्ष दिले.

एक दिवस आ अब लौट चले चित्रपटाच्या सेटवर अक्षयने ऐश्वर्याला प्रपोज केले. त्याने तिला त्याच्या मनातील सर्व भावना सांगितल्या. त्या वेळेस ऐश्वर्याने अक्षय प्रपोजलचे काहीच उत्तर दिले नाही. ती हसत तिथून निघून गेली.

ऐश्वर्याचे हे वागणे अक्षयला समजले नाही. त्या दिवसानंतर शांत स्वभावाच्या अक्षयने ऐश्वर्याला प्रपोज केले नाही. तो एखाद्या मित्रासारखा तिच्याशी वागत होता. ती देखील चांगला मित्र म्हणून अक्षयकडे पाहते. आजही दोघांची मैत्री कायम आहे.

ऐश्वर्यानंतर अक्षयला करिश्मा कपूर आवडली होती. अक्षयच्या आईने करिश्माला लग्नासाठी मागणी घातली होती. पण करिश्माच्या आईला हे नातं मान्य नव्हते. तिने हे स्थळं नाकारले होते. ४० वर्षांचा अक्षय आजही अविवाहीत आहे.

महत्वाच्या बातम्या –

माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

तारक मेहतामधील तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयुष्यात आहेत एकमेकांचे कट्टर वैरी, कारण..

एका टॉपसेल फोटोशूटमूळे वादाच्या भवऱ्यात अडकली होती ममता कुलकर्णी

….म्हणून राजेश खन्नाने मागितली होती अमिताभ बच्चनची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.