अक्षय कुमारने स्वत:च्या लग्नात पंडितला दिली होती घुस; कारण ऐकून चकित व्हाल

बॉलीवूडचे खिलाडी अक्षय कुमारच्या आयूष्यात अनेक सुंदर मुली आल्या. रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, पुजा बत्रा, आयशा झुल्का अनेक अभिनेत्रींसोबत त्यांच्या प्रेम कहानीचे चर्चे रंगले होते. अनेकांसोबत अफेअर करणाऱ्या अक्षयने लग्न मात्र राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्नासोबत केले.

सुरुवातीला तर राजेश खन्नाने अक्षय कुमारसोबत मुलीचे लग्न करुन द्यायला सरळ नकार दिला होता. पण नंतर मात्र मलीच्या हट्टासमोर त्यांना हार मानावी लागली. १७ एप्रिल २००१ ला अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने लग्न केले.

त्यांच्या लग्नाचे आणि प्रेम कहानीचे अनेक किस्से खुप प्रसिद्ध आहेत. पण एक किस्सा खुपच खास अक्षयने स्वत कपिल शर्माच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. त्यामूळे सर्वांनाच धक्का बसला होता. जाणून घेऊया काय आहे तो किस्सा.

अक्षय कुमारने सांगितले, ‘लग्नात अनेक विधी असतात. त्या करणे खुप गरजेचे असते. पण त्या सगळ्यात खुप जास्त टाईम जातो. तासोंतास तुम्हाला एका ठिकाणी बसून राहावे लागते. मला बसून बसून कंटाळा आला होता. म्हणून मी माझ्या लग्नात पंडितला फेरे लवकर करायला सांगितले होते. त्यासाठी मी त्यांना काही पैसे दिले होते.

हे ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. पण अक्षयने ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. अक्षय आणि ट्विंकल एकमेकांना सुरुवातीपासून ओळखत होते. पण ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या प्रेम कहानीची सुरुवात झाली होती.

त्यावेळी अक्षय कुमार शिल्पा शेट्टीला डेट करत होता. तर ट्विंकल देखील एका दुसऱ्या व्यक्तिला डेट करत होती. पण काही कारणामूळे त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपमूळे ट्विंकल दुखी होती. अशा परिस्थितीमध्ये अक्षयने तिला आधार दिला.

दोघांच्या अफेअरच्या बातम्या सगळीकडे पसरल्या होत्या. २००१ मध्ये त्यांनी लग्न केले. खुप कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये दोघांचे लग्न झाले होते. गेली २० वर्ष दोघेही एकत्र राहत आहेत. अक्षय आत्ता पुर्णपणे फॅमिली मॅन बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

द कपिल शर्मा शो मधील सुगंधा ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत करणार लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.