अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. ३०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ ५० कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला सपशेल नाकारले आहे. (Akshay already knew that ‘Prithviraj’ would flop; Director’s big revelation)
‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटण्याची अभिनेता अक्षय कुमारला आधीच कल्पना होती. याबाबत अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी(Chandrprakash Dewedi) यांच्या सोबत चर्चा देखील केली होती. एका मुलाखतीत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यासंदर्भात खुलासा केला आहे.
यावेळी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले की, “एकदा अक्षय कुमार मला म्हणाला होता की जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. तर यापुढे तो ‘राऊडी राठोड’, ‘हाऊसफुल्ल’ सारखे सिनेमे करेल”, असे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील भाष्य केलं आहे.
“जेव्हा एखादा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा निर्मात्याला खूप दुःख होते. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. जर या सिनेमाला यश मिळालं तर यशराज सिनेमा यांसारख्या विषयांवर चित्रपट बनवेल. नाहीतर यशराज सतत चित्रपट बनवतच आहेत. ज्या विषयांवरील चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतील त्यासारखेच चित्रपट प्रॉडक्शन हाऊस बनवत राहतील”, असे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितले आहे.
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी पुढे म्हणाले की, “मला आठवते की अक्षयने एकदा मला वैयक्तिकरित्या सांगितले होते की मी ‘राऊडी राठोड’, ‘हाऊसफुल्ल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये जास्त पैसे मिळतात. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा माझ्यासाठी एक प्रयोगशील चित्रपट आहे. ”
महत्वाच्या बातम्या :-
थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ
‘या’ मुलीमुळे सुशांत सिंग राजपूत 4 रात्री झोपू शकला नाही; ‘असा’ होता त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल