अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर केले ‘हे’ गंभीर आरोप; प्रकरण चिघळलं 

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

याच प्रकरणी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर गंभीर आरोप केले आहेत. ‘फक्त अर्णब गोस्वामीमुळे अन्वय नाईक यांना पैसे मिळाले नाहीत. ते जर मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे,’ असे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी म्हंटले आहे.

याचबरोबर ‘अर्णब गोस्वामीसारख्या माणसांची ही मानसिकता आहे. जे कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते कोणत्याही नागरिकाने याला न्याय देऊ नये. आम्ही सुशांत सिंह राजपूत नाही,’ अशी सनसनाटी टीका अक्षता नाईक यांनी केली आहे.

दरम्यान, ‘गोस्वामी हे माझ्या वडिलांना वारंवार धमक्या देत होते. पैसै तुला मिळणारच नाही. जे मिळालेत ते पण मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईन. त्यावेळी यावरून आमची चर्चाही झाली होती की, पोलिसांत तक्रार करू. पण त्यांना मुलीचं करिअरही उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली असल्याची माहिती मुलीकडून मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!
मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल
…त्यामुळे शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.