Share

केएल राहूल पाठोपाठ अक्षर पटेलनेही बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे सुंदर फोटो

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही नवरदेव बनला आहे. त्याचा सहकारी खेळाडू केएल राहुलने 23 जानेवारीला लग्न केले. अक्षर पटेलच्या पत्नीचे नाव मेहा वडोदर आहे. आज अक्षर आणि मेहाचे लग्न आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या लग्नासाठी अक्षरने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. अक्षर पटेल नवरदेव बनून आपल्या वधूला घेण्यासाठी पोहोचला आहे. त्यांचे लग्न सामान्य पद्धतीने होत आहे. तो आपल्या कुटुंबासह वरात घेऊन जात आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे.

यामुळे खेळाडू अक्षरच्या लग्नाला जाऊ शकले नाहीत. मात्र विश्रांती घेणारे खेळाडू तेथे पोहोचले. यामध्ये जयदेव उनाडकटच्या नावाचाही समावेश आहे. हळदी समारंभात अक्षर पटेल आणि मेहा यांनीही डान्स केला. बुधवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अक्षर पटेलच्या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षर पटेल आणि त्याची गर्लफ्रेंड मेहा यांची गेल्या वर्षी २० जानेवारीला एंगेजमेंट झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

डावखुरा फिरकी गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज अक्षर पटेलने मेहाला तिच्या २८व्या वाढदिवसाला प्रपोज केले. त्यानंतरच दोघांनी एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातल्या. अक्षर पटेलची भावी पत्नी मेहा ही व्यवसायाने आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते.

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने अक्षर पटेल आणि त्याच्या भावी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये कैफने दोघांनाही नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेहाच्या एका हातावर अक्षयच्या नावाचा टॅटू आहे, जो अक्षर पटेलच्या नावाशी संबंधित आहे.

महत्वाच्या बातम्या
‘मी रात्रभर झोपू शकलो नाही’, सूर्याला कसोटी संघात निवडल्याने संतापला सर्फराज खान; दु:ख व्यक्त करत म्हणाला..
मविआ जिंकणार लोकसभेच्या ३४ जागा, भाजप-शिंदेगटाला बसणार मोठा फटका! सर्वेतून समोर आले निष्कर्ष
प्रचंड पैसा कमावूनही ‘पठाण’ फ्लॉपच? समोर आलं ‘हे’ सर्वात मोठं कारण

खेळ ताज्या बातम्या तुमची गोष्ट मनोरंजन

Join WhatsApp

Join Now