माणुसकीला सलाम! रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रोजा तोडला आणि केले प्लाझ्मा दान

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णांमुळे काही रुग्णांना उपचारदेखील मिळत नाही. पण अशा संकटातही काही लोक मदतीसाठी धावून येताना दिसत आहे.

त्यातलेच एक नाव म्हणजे अकील अहमद. रमजानच्या पवित्र महिन्यात त्याने रोजा सोडून प्लाझ्मा दान केले आहे. अकिलच्या या कामामुळे दोन कोरोनाबाधित महिलांचा जीव वाचला आहे. त्यामुळे सगळीकडे अकीलचे कौतुक केले जात आहे.

उदयपुरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये छोटी सादडी गावातील ३६ वर्षीय निर्मला चार दिवसांपासून तर ऋषभदेव येथे राहणारी ३० वर्षीय अलका दोन दिवसांपासून भरती आहे. त्यांची परिस्थिती खुप गंभीर होती, त्यामुळे दोघांनीही प्लाझ्माची गरज होती.

त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने प्लाझ्माची व्यवस्था करण्यास सांगितली होती. त्यानंतर ही गोष्ट रक्त युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली. ते प्लाझ्माच्या शोधात असताना त्यांना अकीलची आठवण झाली. कारण याआधी अकील यांनी १७ वेळा रक्तदान केलेले होते आणि विशेष म्हणजे त्या दोन्ही महिलांचा आणि अकील यांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह होता.

अशात कार्यकर्त्यांनी अकिल यांच्याशी संपर्क साधला आणि प्लाझ्मा दान करण्याची विनंती केली. अकिल यांनी कुठलाही विचार केला नाही आणि प्लाझ्मा दान करण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली. पण अकील यांचा रोजा होता आणि उपाशी पोटी प्लाझ्मा दान केले जात नाही, त्यामुळे त्यांनी अल्लाहाचे आभार मानले आणि रोजा तोडून नाश्ता केला.

डॉक्टरांनी त्यांची अँटीबॉडीज टेस्ट केली आणि प्लाझ्मा घेतला. अकील यांनी प्लाझ्मा दान केल्याने त्या दोन्ही महिलांची जीव वाचवण्यात आला आहे. अकिल यांनी आतापर्यंत तीन वेळा प्लाझ्मा दान केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
आलिशान गाड्या, मुंबईत बंगला, फ्लॅट; ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले किशोर नांदलस्कर
केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.