एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबादमध्ये भाषण केले. या भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?”, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना(Raj Thakare) टोला लागवला आहे.(akburddin owesi statement about raj thakre)
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची आज औरंगाबादमधील भाषणात राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तू आम्हाला घाबरवण्याचा पर्यटन करत आहेस. पण आम्ही घाबरणार नाही. तुमची लायकी नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ”, असे एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमधील सभेत म्हणाले आहेत.
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी आपल्या भाषणात म्हणाले की, “आपल्या देशात २० कोटी मुस्लिम लोक आहेत. मी महाराष्ट्रातील मुस्लिम लोकांना कधीच विसरणार नाही. माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या मुस्लिम बांधवाचे मी आभार मानतो. तुमच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे”, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “मी कुणाला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही. तुमची लायकी नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ. ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?”, असे एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.
आज एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्याहस्ते औरंगाबादमधील एका शाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, ” हा देश फक्त एकाच धर्माच्या लोकांनी तयार झालेला नाही. या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. सर्वधर्मातील लोकांची प्रगती झाली तरच भारत पुढे जाईल”, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी एमआयएम पक्षाचे नेते वारीस पठाण आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील देखील उपस्थित होते. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेण्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
माझ्या आईला गँगस्टरचा फोन आला होता, तो म्हणाला की.., अमजद खान यांच्या मुलाचा मोठा खुलासा
पुण्यात ११ वर्षीय मुलाला २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडलं; आईनेच केली पोटच्या पोराची भयानक अवस्था
‘या’ तीन पदार्थांमधून मिळते भरपूर कॅल्शियम, हाडांच्या त्रासावर रामबाण उपाय