Share

‘तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही’, बढाई मारणाऱ्या PCL ला माजी क्रिकेटपटूने दाखवली जागा

Rameez-Raza

भारतामध्ये आयपीएल क्रिकेट लीग यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने PCL लीगची सुरवात केली होती. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड नेहमीच बीसीसीआय(BCCI) सोबत स्पर्धा करत आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर नाराज झाले होते.(akash chopra reply to pcb rameez raja)

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतामधील आयपीएल स्पर्धेला खुलं आव्हान दिलं होतं. PCL मध्ये लिलाव पद्धत सुरु झाल्यास आयपीएल स्पर्धा खेळायला कोणीही जाणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले होते. या वक्तव्यावरून एका भारतीय माजी क्रिकेटपटूने रमीझ राजा यांच्यावर निशाणा साधला आहे.

या भारतीय माजी खेळाडूचे नाव आकाश चोप्रा(Akash Chopra) असं आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा रमीझ राजा यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, “जरी तुम्ही लिलाव पद्धत सुरु केली तरी काही फरक पडणार नाही. कारण तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही. मार्केटमधील सेटअप तुम्हाला तसं करूच देणार नाही”, असं मत आकाश चोप्रा यांनी मांडलं आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा पुढे म्हणाले की, “स्पष्टच सांगायचं तर ख्रिस मॉरीसचा गेल्या वर्षीच्या हंगामातील एक चेंडू देखील कित्येक खेळाडूंच्या मानधनापेक्षा जास्त होता. IPL, BBL, The Hundred किंवा CPL यांच्याशी तुलना करणं तुमच्या दृष्टीने खूपच अति आहे. तुम्ही जर खेळाडूंच्या किंमती, फ्रेंचायजी च्या आर्थिक मर्यादा, संघाची किंमत हे एकमेकांशी संबंधित आहे. जर तुम्ही सारं काही वेगवेगळं पाहत असाल तर तुम्ही उध्वस्त व्हाल”, असे आकाश चोप्रा म्हणाले आहेत.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी या प्रत्युत्तरातून बढाई मारणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डला त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आयपीएल स्पर्धेला चॅलेंज दिलं होतं. “आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आम्हाला नवीन सोर्स तयार करायला हवा. पुढील वर्षी PSL च्या रचनेत बदल करून लिलाव पद्धत आणायची आहे.” असे रमीझ राजा म्हणाले होते.

लिलाव पद्धत सुरु केल्यानंतर अनेक प्रायोजक आकर्षित होतील. हा पैशांचा खेळ आहे. जर आम्ही PSL मध्ये लिलाव पद्धत सुरु केली आणि फ्रेंचायजींच्या मर्यादा वाढवल्या, तर PSL सोडून कोण IPL खेळायला जात, तेच बघूया”, असं वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केलं होतं. यावरून बीसीसीआय विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असा वाद सुरु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सलमान खान मेगास्टार चिरंजीवींच्या ‘या’ चित्रपटात फ्रीमध्ये करणार काम; साऊथमध्ये करणार दमदार एन्ट्री
‘मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो, माझ्यावर ३-४ खटले दाखल आहेत’; ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील ‘ते’ संवाद म्यूट केल्यामुळे संतापला चिन्मय मांडलेकर, म्हणाला, ‘हे चुकीचं आहे’

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now