Share

नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझं घर देईन, खादिमचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल तेली या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजस्थानमध्ये(Rajsthan) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान अजमेरमधून एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.(ajmer salman chishti conterversial video viral social media)

या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ‘जो नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझे घर देईन’, असे वादग्रस्त विधान अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी केलं आहे. सलमान चिश्ती हे दर्गा पोलीस स्टेशनचे हिस्ट्रीशीटर देखील आहेत.

अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सलमान चिश्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सध्या अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती म्हणाला की, “वेळ पूर्वीसारखी नाही. आईची शपथ घेऊन सांगतो मी तिला जाहीरपणे गोळ्या घातल्या असत्या. माझ्या मुलांची शपथ घेऊन मी तिला गोळ्या घातल्या असत्या. आजही मी छातीठोकपणे सांगतो, जो कोणी नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझे घर देईन.”

सलमान चिश्तीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानमधील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा शोध घेत आहेत.

यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधिकारी विकास सांगवान यांनी सांगितले की, सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. सध्या सलमान चिश्तीचे लोकेशन काश्मीरमध्ये दाखवले जात आहे. याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
रश्मिकाच्या हातात ‘ती’ गोष्ट पाहून घाबरली होती तिची आई, स्वत: रश्मिकाने सांगितला किस्सा
“सगळे सोबत आहात ना रे बाबांनो…”, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, वाचा काय म्हणाले?
काल माईक खेचला पुढे काय खेचतील सांगता येत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now