पुण्यातील कोरोना प्रसारामुळे अजितदादा भडकले, अधिकाऱ्यांना दिला सज्जड दम; म्हणाले

पुणे । पुणे शहर तसेच ग्रामीण भागात देखील कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात संक्रमण वाढत आहे.

मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. मग पुण्यात काय अडचण आहे. असे यावेळी अजित पवार म्हणाले.

मी तुम्हाला आता एकदाच सांगतोय, मला परत परत सांगायला लावू नका, नाही तर परिमाण भोगावे लागतील, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

बैठकीत पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तासह, ग्रामीण पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. अजित पवार म्हणाले, लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही.

नागरिक मोठ्या प्रामाणात मास्क न लावता फिरत आहेत, लग्नांमध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांवर कोणाचे निर्बंध राहिले नाहीत. अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर राखले जात नाही असे असताना यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही.

यामुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची प्रचंड वेगाने वाढली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार नुसार निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा.

मास्कचा वापर करायला लावा. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील पवार यांनी यावेळी दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.