अजितदादांचा शिवसेनेला दे धक्का; पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या एकत्र सरकारमध्ये आहेत. या प्रवेशामुळे सर्वांना धक्का बसला. शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.