अजितदादांच्या कामांचा जगात डंका! कोरोना काळातील कामांमुळे सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात राज्याचा कारभार व्यवस्थित संभाळला. त्यांनी अनेक महत्त्वाची कामे देखील केली. या कामाची दखल घेत लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून अजित पवार यांचा ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. हा एक मोठा पुरस्कार मानला जातो.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित पवारांना देण्यात आला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांनी याबाबत जगभरात ७० देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. यामध्ये कोरोना काळात या अनेकांनी केलेल्या कामाची दाखल घेण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ही संस्था कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने व्यक्ती व संस्थांना सन्मानित करते. या काळात अजित पवार यांनी मंत्रालय स्तरावर निर्णय घेतले आहेत. अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय, आरोग्य, वैद्यकीय सुविधा देण्यासाठी केलेले कार्य यामुळे त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे.

अजित पवार राज्यात फिरत असतात, कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असतात. गरज असेल तिथे लगेच निर्णय घेतात. मोठ्या शहरांमध्ये यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत झाली. यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला. याबाबत लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे भारतातील राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी माहिती दिली.

ही संस्था जगातील विश्वविक्रमाची नोंद करण्याचे काम करते. एखाद्या विषयात उल्लेखनीय काम, तसेच एखाद्या क्षेत्रात नवीन रेकॉर्ड केला असेल तर किंवा कुणाचे रेकॉर्ड मोडले असेल तर ही संस्था त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेला पुरस्कार प्रदान करते, असे या संस्थेचे काम आहे.

ताज्या बातम्या

दुख:द बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन; वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास

ठाकरे सरकारला मोहरमची गर्दी चालते पण गणेशोत्सावासाठी लोक निघाले की लगेच यांचा कोरोना निघतो- नितेश राणे

‘असा’ ओळखा डेंग्यु आणि सामान्य तापामध्ये फरक अन् वेळीच घ्या उपचार; वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.