Ajit Pawar : राज्यभरात शुक्रवारी सगळीकडे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांसाठी एक मोठी घोषणा केली. दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा सुरु केल्या जाईल. तसेच गोविदांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्लादेखील दिला आहे.
अजित पवार आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला भेट देणार आहेत. यावेळी राज्य सरकारच्या दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयाविषयी त्यांना विचारले. यावर त्यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, गोविंदा पथकांना आरक्षण देण्याविषयी तुम्ही निर्णय घेतला. परंतु, उद्या त्यांच्यातील एखाद्या अशिक्षित मुलाने त्या पथकात पारितोषिक मिळवले, तर त्याला कोणती नोकरी देणार आहात?, असा प्रश्न अजित पवारांनी राज्य सरकारला विचारला आहे.
तसेच जी मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यांना तुम्ही काय देणार? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. हजारो मुलं-मुली पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षकांची भरतीची वाट बघत आहेत. तुम्ही तिथे भरती का करत नाहीत?, असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर भावनिक होऊन कोणताही निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच गोविंदांना देण्यात येणाऱ्या विम्याचा निर्णय त्यांना पटला असल्याचेही ते बोलले.
कुणालाही विश्वासात न घेता एकदम ५ टक्के आरक्षणाची घोषणा करणे योग्य नाही. कुणालाही विश्वासात न घेता आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं, असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनदेखील प्रचंड विरोध होत आहे.
महत्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : “खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?”
Mahavikas Aghadi : विधानपरिषद सभापती निवडीत भाजप-शिंदेंच्या अडचणीत वाढ, ‘मविआ’ला मात्र होणार फायदा
‘गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो, पण…,’ उदय सामंतांचा ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट
शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना ‘दे धक्का’; ‘ते’ १० कोटी महागात पडणार