“तिकडे काहीजण पळाले अन् त्यांचा पायगुण असा की…” पक्षसोडून गेलेल्यांना अजितदादांच्या कानपिचक्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कामांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अजितदादा पक्षाचे नेते असू की कार्यकर्ते नेहमीच त्यांच्यावर अनोख्या अंदाजात टिका करताना दिसतात. इंदापुरमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

अजित पवार म्हणाले की, सत्ता आहे काहीजण तिकडं पळाली, त्यांचा पायगुण असा, की त्यांची सत्ता गेली आणि आमची आली. आता असली जित्राबं आपल्याला नकोचं. यांनी कितीही होय म्हणू द्या मी नाहीचं घ्यायचं म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका.

मला पण राजकारणात ३० वर्ष झालीत. त्यावेळी माझ्यासोबत तरूणांची टीम होती. आताही आपन तरूणांची टीम तयार करू. तुम्ही चांगली कामे करा. दिलेला शब्द पाळा, शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठेने राहा. असं त्यांनी म्हटलं आहे.

इंधन दरवाढीबद्दल फडणवीसांवर हल्लाबोल

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची दरवाढ केली आहे. याचं फडणवीसांना समर्थन करता येत नाही म्हणून ते राज्य सरकारवर टिका करत असतात. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी ‘केंद्र सरकारच्या दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रूपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये’ असं वक्तव्य केलं असणार. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
म्हत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा’’ रतन टाटांचे भावनिक अवाहन
मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा  IPL खेळणार; कमीत कमी ‘इतके’ लाख तरी मिळणारच
संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.