‘बिब्बा कालवणारे ते जित्राब लय वाईट’ अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

पुणे | बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणूकीला उभे राहिलेल विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. ‘काहीजण बिब्बा कालवायचं काम करतात. ते जित्राब लय वाईट’ अशा शब्दात पवारांनी टीका केली आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सतत महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादीवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सवाल उपस्थित करत असतात. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.

‘’जर काही चांगल चाललं असताना आपल्याकडे म्हणतात ना बिब्बा कालवायचं काम करतात ते जित्राब लय वाईट. त्यांचा अजिबात विचार करु नका. तसबी तुम्ही बारामतीकर विचार करत नाहीत. जर बाहेरचं कुणी पार्सल आल तर त्याच डिपॉझीट जप्त करुन परत पाठवता’’, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेला बारामतीतून उभे राहिलेले विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.

दरम्यान, बारामतीत गदीमा सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आता नाव न घेता अजित पवारांनी केलेल्या टीकेवर आमदार गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“माझे डिपॉझिट जप्त झाले तरी भाजपने मला आमदार बनवले”; गोपीचंद पडळकर
देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाला गोपीचंद पडळकरांची केराची टोपली; मनात आलं, तेच केलं…
मी भूमिका मांडल्यानंतर गोपीचंद पडळकर भाजपात राहणार नाहीत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.