मोठी बातमी! अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ घोषणा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. महाविकास आघाडीचा सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक विभागांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी ४२ हजार कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले, कठिण काळात कृषी क्षेत्राने राज्याला सावरले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी शून्य टक्क्यांनी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच तीन लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेऊन वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराचा फायदा होणार आहे.

तसेच पुढे म्हणाले, विकेल ते पिकेल योजनेसाठी २ हजार १०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या सौरउर्जा जोडणीसाठी १५०० कोटी रूपयांचा निधी महावितरणला दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जाणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

दरम्यान अर्थमंत्र्यांनी आरोग्य, क्रिडा, रस्ते वाहतूक, शिक्षण, सांस्कृतिक, रेल्वे, महिला, पर्यटन क्षेत्र अशा अनेक विभागांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महत्वाच्या घोषणा-
‘राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला’, औरंगाबादेत गंभीर आरोपांची तक्रार दाखल
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला पहिला सामना
भाजपात प्रवेश करताच मिथून चक्रवर्ती यांचा विरोधकांना इशारा, म्हणाले “मी खरा कोब्रा….”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.