अजित पवारांचे संकेत; कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कुणीही राजकारण करू नये. अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाहीत हे घातक आहे. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून याबाबत चर्चा केली जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन यामध्ये चर्चेतून काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, त्यासाठी नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी, असे पवारांनी स्पष्टपणे सांगितले. काही गोष्टींच्या बाबतीत वेळीच निर्णय न घेतल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, “काही गोष्टींमध्ये आपण वेळीच निर्णय़ नाही घेतले, तर अडचणींना सामोरं जावे लागते. ग्रामस्थ, नागरीक मास्क वापरण्याचा अजिबातच विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे, गंभीरतेने घ्यायला हवं.” असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
रामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; बिबट्याला दिलेल्या नावाची होत आहे सर्वत्र चर्चा
दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक
काय सांगता! पंतप्रधान मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.