…तर लॉकडाऊन लावावा लागेल; अजित पवारांनी दिला सूचक इशारा

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संबधीचे नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालण करणे गरजेचं आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन लावण्यात येण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

तसेच करोनाचा प्रसार वाढत आहे. पुढील काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक पार पडली. यावेळी ते म्हणाले, ‘ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या.’

दरम्यान, “सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे. याकडे विशेष लक्ष द्यावं तसंच लसीकरणाचा वेग वाढवावा,’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरोना रुग्णांची  राज्यातील संख्या ५० हजारांवर…
शनिवारी कोरोनाच्या ४९ हजार ४४७ रुग्ण आणि २७७ मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, राज्यात शुक्रवारी ४७ हजार रुग्णांची नोंद झाली होती. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोदींची हातचलाखी! सामान्य माणसाच्या खिशातून २२५ रुपये काढून त्याला दिले फक्त १० रुपये

मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शुटरला युपीतून अटक; घेतले राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे नाव

‘लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.