एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर अजित पवार काय म्हणतात पहा..

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या मार्गावर आहेत. अशी चर्चा रंगत आहे. पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अशी चर्चा काही दिवसांपसून रंगली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल झालेल्या सोलापूर कार्यक्रमात पत्रकारांना उत्तर दिले आहे.

भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार? असा प्रश्न सोलापूरच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसमोर हात जोडता सांगितले मला या विषयांमध्ये किंचितही माहित नाही.

पुढे ते म्हणाले ज्या विषयाची मला काहीच माहित नाही तो विषय मी तुम्हाला कसा सांगणार? अतिवृष्टीच्या प्रश्नांमध्ये राजकीय प्रश्न आल्यामुळे अजित पवार वैतागले.

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. दरम्यान सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगसेवक तोफिक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

इंडियन ऑईलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! एक लाखांपर्यंत मिळणार पगार; ‘असा’ करा अर्ज

८० वर्षांचा योद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये! बेजार बळीराजाच्या भेटीला थेट बांधावर

स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.