कोरोनाकाळात पाच महीने घरी बसूनही तुम्हाला पगार दिला, आता जरा दुसऱ्यांच्या वेदनांचा विचार करा

मुंबई | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांच्या शिक्षकांनी वेतनबाबत केलेल्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ‘करोना काळात राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली होती. मात्र या काळातही १२ हजार कोटींचे वेतन शिक्षकांना ५ महीने घरी बसून दिले,’ असे ते म्हणाले.

माळेगाव बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकर सहकार संकुलासह विविध विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘खरेतर मला वाटत होते की मी अर्थमंत्री असल्याने माझी पैशाची ओढाताण पाहून हे शिक्षकमंडळी आम्हाला अर्धा पगार द्या म्हणण्यासाठी येतील, असे वाटले होते.’

मात्र त्यांनी तर आमचा पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. अरे…बाबांनो जरा इतरांच्या वेदनांचा विचार करणार आहात की नाही?” अशा शब्दांत शिक्षकांच्या मागण्यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात शेती पंपाचे थकीत वीजबिल 40 हजार कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी सरकारने पन्नास टक्के सवलतीवर थकबाकी वसुली योजना जाहीर केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
‘अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी
‘धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त’
तात्याराव लहानेंनी केलेल्या गौप्यस्फोटाने उडाली राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.